अकोले : हळदी समारंभात असलेल्या जेवणातून जवळपास १५० लोकांना विषबाधा झाली आहे. अकोले तालुक्यातील मवेशी करवंदरा येथे ही घटना घडली. यामध्ये ५४ लोकांची प्रकृती गंभीर असून बाधितांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मवेशी करवंदरा येथील एका हळदी समारंभात (दि. २७ फेब्रुवारी) दुपारी हळदीच्या कार्यक्रमात अनेकांनी जेवण केले. त्याच दिवशी संध्याकाळी व दुसऱ्यादिवशी सकाळी जेवण केलेल्या लोकांना त्रास जाणवू लागला. यामुळे लागलीच या सर्वांना राजुर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
काहींना नाशिक येथे हलविण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार २६ रुग्ण राजूर रुग्णालयात, कोहणे ग्रामीण रुग्णालयात १६, तर खिरबिरे येथे १२ रुग्ण दाखल असून, २० रुग्णांचे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इतरही काही उपचाहर घेत आहेत.
जिल्हा आरोग्य अधिकारी, सिव्हिल सर्जन याना माजी आमदार वैभवराव पिचड यांनी संपर्क करून रुग्णाची माहिती देऊन उपचारासाठी प्रयत्न केले.
हळदी समारंभामध्ये जेवणामधून नागरिकांना विषबाधा झाल्याचे समजताच राजूर ग्रामीण हॉस्पिटल येथे तातडीने जाऊन रुग्णांची विचारपूस केली. दूरध्वनी वरून सिव्हील सर्जन अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, तसेच राजूर येथील डॉक्टर यांना सर्व उपचार उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या.
विषबाधा झालेल्यांची नावे : १) कृष्णा रामचंद्र भांगरे २) सार्थक भाऊ भांगरे ३) सखुबाई संजय कोंडार ४) बुधाबाई शरद कोंडार ५) सुलाबाई अशोक कोंडार ६) तेजस शरद कोंडार ७) गणेश दौलत मोहंडुळे ८) मनीषा शंकर भांगरे ९) देवकाबाई भाऊ भांगरे १०) सोलाजी बुधा कवटे ११) समीर निवृत्ती भांगरे १२) निखिल वाळू भांगरे
१३) बत हिराबाई बाळू भांगरे १४) अलकाबाई शंकर भांगरे १५) तानाबाई नामदेव भांगरे १६) सबिता सुरेश कडव १७) सीताराम गोगाजी १८) मिराबाई नामदेव भांगरे १९) आदित्य गोरक्ष भांगरे २०) सुमन बाळू कोंडार आदींसह जवळपास हा आकडा १५० च्या आसपास जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.