अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :- राहुरी तालुक्यातील माहेगाव- मानोरी येथील गणपतवाडी शिवारामध्ये विजेच्या शॉर्टसर्किटने सुमारे पंचवीस ते तीस एकर ऊस जळून खाक झाला आहे.
गणपतवाडी येथील राजेंद्र पटारे या शेतकऱ्यांच्या उसाच्या क्षेत्रामध्ये विजेच्या तारांना तारा घासून खाली हे लोळ पडल्याने हि आग लागली असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
हि आग लागल्याने या क्षेञाजवळील कारभारी पटारे, बाळासाहेब वेताळ, रामभाऊ देठे,चंद्रभान देठे, बाळासाहेब लांडगे, बबन गिते, बाबासाहेब पटारे आदि शेतकऱ्यांच्या ऊसाला देखील हि आग लागली.
आगीचा प्रवाह इतका मोठा होता की परिसरातील वरील शेतकऱ्यांचे सुमारे पंचवीस ते तीस एकर उसाचे क्षेत्र हे पूर्णपणे जळाले आहे.
घटनेची माहिती समजताच परीसरातील चारशे ते पाचशे नागरिकांनी आज विझविण्यासाठी गर्दी केली होती. आगीचा प्रवाह मोठ्या प्रमाणात असल्याने ही आग आटोक्यात आली नाही.
सायंकाळी ही आग आटोक्यात आली आहे मात्र तोपर्यंत परीसरातील ऊसाचे सर्वच क्षेत्र जळून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम