अहमदनगर ब्रेकिंग : टेम्पो दुचाकीच्या धडकेत १७ वर्षीय युवक ठार

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2021 :- वेगाने येणारा टेम्पोने समोरून धडक दिल्यामुळे दुुचाकीवरून जात असलेला १७ वर्षीय युवक ठार झाला. ओम गंगाधर फलके (रा. निमगाव वाघा, ता. नगर) असे मृत युवकाचे नाव आहे.

२१ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास नगर कल्याण रोडवर निमगाव फाट्याजवळ हा अपघात घडला. याप्रकरणी ओमचे वडील गंगाधर फलके

यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी विकास जपे (रा. खातगाव) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe