अपघाताचा बनाव करून प्रवाशांना लुटणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केला आहे. पोपट लक्ष्मण नरवडे (वय ४५, रा. मोमीन आखाडा, ता. राहुरी) असे आरोपीचे नाव आहे.
ह्याबाबत अधिक माहिती अशी, अशोक बप्पासाहेब जाधव (वय २३, रा.वांजरावस्ती,लोणी घाट, ता.जिल्हा बीड) व त्यांचे मित्र कार मधून चालले होते.
ते नगर शहरातील जलभवन पाटबंधारे विभाग, तारकपूर या ठिकाणी आले असता आरोपी मोटारसायकलवर त्याठिकाणी आला.
तुमच्या गाडीच्या कटमुळे मी पडलो, तुम्ही माझा दवाखान्याचा खर्च करा अशी दमदाटी केली. तसेच अशोक जाधव यांच्याकडील ३० हजार रुपये रोख, आधारकार्ड व लायसन्स घेऊन फरार झाला होता. त्यानंतर जाधव यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक राकेश ओला. यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना पथक नेमून गुन्ह्याचा तपास करुन गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले.
यानुसार आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई सोपान गोरे, पोहेकॉ संदीप पवार, अतुल लोटके, पोना/रविंद्र कर्डीले, संतोष खैरे, गणेश भिंगारदे व पोकॉ रणजीत जाधव आदींचे पथक तयार केले. त
पास सुरु असताना पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना २३ नोव्हेंबरला गुप्तबातमीदारामार्फत माहिती मिळाली की, वर नमुद गुन्हा हा पोपट नरवडे याने केला हे. तो सध्या गावी आहे. पथकाने लागलीच त्या ठिकणी जाऊन त्यास जेरबंद केले. त्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.