अहमदनगर ब्रेकींग: वेगळ्या जातीची असल्याने युवतीसोबत लग्नास नकार; तरूणाविरूध्द गुन्हा !

Published on -

मुळची राहुरी तालुक्यातील व सध्या पारनेर तालुक्यात राहणार्‍या युवतीवर तरूणाने लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केले. पीडित युवतीने काल (मंगळवार) रात्री एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून वैभव दत्तात्रय झिंजुर्डे (रा. अरणगाव ता. नगर, हल्ली रा. दुधसागर सोसायटी, केडगाव) याच्याविरूध्द अत्याचार, अ‍ॅट्रोसिटी आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डोंगरगण (ता. नगर) व वेगवेगळ्या ठिकाणी सन 2016 ते 8 मे, 2022 दरम्यान वेळोवेळी ही घटना घडली आहे. सन 2016 पासून वैभव झिंजुर्डे याने फिर्यादी युवतीसोबत लग्न करतो, तिला चांगले संभाळतो, असे म्हणून लग्नाचे आमिष दाखविले.

युवतीवर वेळोवेळी डोंगरगण व इतर ठिकाणी अत्याचार केला. फिर्यादी युवती वेगळ्या जातीची असल्याने जातीवाद करून लग्न करता येणार नाही, असे म्हणून लग्न केले नाही. पीडित युवतीने पोलिसांत गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपअधीक्षक (नगर ग्रामीण) अजित पाटील करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe