अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात कांदा चाळीसाठी कोट्यवधींची रक्कम मंजूर, वाचा कोणत्या तालुक्याला किती कोटी ?

Ahmednagarlive24 office
Updated:
kanda chal anudan

अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2022 :- नगर जिल्ह्यात कांद्याचे(Onion) उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत आहे. बऱ्याच शेतकऱ्याकडे कांदा साठवुणकीसाठी सोय नसल्यामुळे ते मिळेल त्या किमतीला कांदा विकून टाकतात.

परिणामी अनेकदा शेतकऱ्यांना (Farmer) तोटा होतो. हे होऊ नये म्हणून सरकार, राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून शेतकऱ्यांना कांदा चाळ(Onion Chal) बांधण्यासाठी ८७ हजार ५०० रुपये अनुदान देते. त्यासाठी नगर जिल्ह्यातून ८८ हजार शेतकऱ्यांचे महाडीबीटीवर अर्ज आले होते.

नगर जिल्ह्यात २०२१-२२ व २०२२-२३ या दोन वर्षासाठी २ हजार ५२३ कांदा चाळी उभारण्याचे लक्ष्य ठेवले आहे. मागच्या वर्षी कोरोनामुळे फारसा निधी मंजूर झाला नव्हता.

आता कोरोनाचे संकट कमी झाले असल्याने भरीव निधी सरकारने मंजूर केला आहे. कांदा चाळीसाठी या वर्षाला २२ कोटी ७ लाख रुपयाचा निधी मंजूर झाला आहे. अशी माहिती जिल्हा फलोत्पादन कृषी अधिकारी किरण मोरे यांनी दिली.

तालुकानिहाय मिळालेला निधी

अकोले: १ कोटी २१ लाख ९६ हजार २८,
जामखेड : १ कोटी ६९ लाख ७४ हजार ७८०
कर्जत: २ कोटी ९५ लाख २५ हजार ३८१

पाथर्डी: १ कोटी ४४ लाख ३६ हजार २९२
शेवगाव: २ कोटी ७९ लाख ७३ हजार ३९७
नेवासा:२ कोटी ४७ लाख ४१ हजार ०१४

श्रीगोंदा: २ कोटी १६ लाख ८१ हजार ९४२
पारनेर:८६ लाख ४९ हजार १३८
नगर: १ कोते ४ लाख ३५ हजार

राहुरी: ९२ लाख ४७ हजार ६२८
राहता: ५६ लाख २९ हजार ९१३
श्रीरामपूर: ९७ लाख ५६ हजार ३३३

कोपरगाव: ९४ लाख ५५ हजार ५०३
संगमनेर: १ कोटी २५ लाख ४७ हजार ०५१

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe