अहमदनगर Live24 टीम, 08 जानेवारी 2022 :- भाजपा युवा मोर्चाचे दक्षिण जिल्हाध्यक्ष तथा देवळाली प्रवरा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांना कोरोनाची लागण झाली असून स्वतः सत्यजित कदम यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून ही माहिती दिली आहे.
जिल्ह्यातील अनेक मंत्री, आमदार- खासदार यांना कोरोनाची बाधा झाली आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात,ना.प्राजक्त तनपुरे, माजी मंत्री तथा राहता विधानसभा मतदार संघाचे लोकप्रतिनिधी आ.राधाकृष्ण विखे पाटील, खा. सुजय विखे,
आ.रोहित पवार यांना कोरोनाची लागण झाली असताना देवळाली नगरपालिकेचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष सत्यजित कदम यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.
व्हास्ट्स अँप पोस्ट मध्ये कदम यांनी म्हंटले आहे. माझी कोरोना टेस्ट आज पॉझिटिव्ह आली आहे.तब्बेत व्यवस्थित आहे.काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली काळजी घ्यावी. कोरोना सदृश लक्षणे आढळल्यास त्वरित उपचार सुरू करावेत.सर्वांनीमास्क लावा व सुरक्षित अंतर ठेवा.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम