अहमदनगर ब्रेकिंग : पोलिस ठाण्याच्या बाथरूम मधे गळफास घेतलेल्या व्यक्तीची ओळख पटली !

Updated on -

Ahmednagar Breaking :-  अहमदनगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या लगत असलेल्या शौचालयात मध्ये एका अज्ञाताचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे,

मात्र या मृत व्यक्ती जवळ त्याची बॅग होती, त्या आधारे त्या व्यक्तीची ओळख पटली असून या गळफास घेतलेल्या या मृत इसमाचे आधार कार्ड सापडले असून त्यानुसार त्याचे नाव ज्ञानेश्वर तुकाराम मराठे (वय-६२ वर्षे) असून ते निवृत्त एसटी महामंडळाचे कर्मचारी आहेत.

गळफास घेतलेले ज्ञानेश्वर मराठे हे १६ तारखेला नगर मध्ये आले आहेत, तसे एसटी बसचे तिकीट त्यांच्या जवळ सापडले आहे.त्यांच्या जवळ असलेल्या बॅग मध्ये आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आणि कपडे होते.

मात्र ते नगर मध्ये का आणि कोणत्या कारणानं साठी आले. आणि कोतवाली पोलीस ठाण्याच्या बाथरूम मधेच आत्महत्या केली याबाबत प्रश्नचिन्ह आहेत.

पोलिसांनी मृत मराठे यांचा मृतदेह शवविच्छेदना साठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला असून कोतवाली पोलीस ठाण्यात याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe