अहमदनगर ब्रेकिंग : माजी आमदाराविरुद्ध गुन्हा दाखल !

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :- वीजप्रश्नी महावितरण कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या विरुद्ध नेवासे पोलिस ठाण्यात आत्महत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस नाईक प्रताप दहिफळे यांनी याबाबत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मंगळवारी (२३ नोव्हेंबर) सायंकाळी पाच वाजता माजी आमदार मुरकुटे व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे तसेच १५ ते २० कार्यकर्ते शेतीपंपाची वीज तोडू नये म्हणून आंदोलन करत होते.

महावितरण कार्यालयात महावितरणचे अधिकारी काकडे व चेचर यांच्या सोबत चर्चा होऊन आंदोलनकर्त्यांचे समाधान न झाल्याने तहसीलदार रुपेश सुराणा तेथे आले.

त्यांनी आंदोलनकर्ते व अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून आंदोलनावर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला होता. परंतु आंदोलनकर्ते मागण्यांवर ठाम होते.

चर्चेत मार्ग निघत नसल्याचे पाहून माजी आमदार मुरकुटे यांनी कार्यालयात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे आंदोलनाच्या दिवशी रात्री ११ वाजून ५९ मिनिटांनी ही फिर्याद दाखल झाली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe