अहमदनगर ब्रेकींग: शिवजयंती मिरवणूक काढणार्‍याविरूध्द गुन्हे दाखल

Published on -

अहमदनगर Live24 टीम,  20 फेब्रुवारी 2022 :- अहमदनगर शहरात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त डीजे लावून विनापरवाना मिरवणूक काढणार्‍या 27 जणांविरूध्द कोतवाली व तोफखाना पोलीस ठाण्यात पाच गुन्हे दाखल झाले आहेत.

तोफखाना पोलीस ठाण्यात पोलीस नाईक तन्वीर शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महेश अरूण कराळे, ओम महेश दोन्ता, करण विजय तनपुरे (सर्व रा. श्रीराम चौक, सावेडी, नगर), सुनील भाऊसाहे गहिरे (रा. बोल्हेगाव, नगर) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोतवाली पोलीस ठाण्यात सहाय्यक फौजदार राजेंद्र गर्गे यांनी चार फिर्याद दिल्या आहेत. त्यानुसार 23 जणांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये ओमकार रमेश घोलप, ऋषिकेश दत्तात्रय कावरे, रोहित रमेश सोनेकर,

शुभम नागेश कोनाकुळ, महेश बाळासाहेब चिंतामणी, कपील दिगंबर ढोकणे, संकेत सुर्यकांत जाधव, राहुल श्रीपाद कातोरे, सोनू दीपक पवार, अक्षय सुरेश शिंदे, उमेश राजू काटे, शुभम दिलीप राहींज,

आदेश राजेंद्र झेंडे, ऋषभ किशोर शिंदे, नितीन मुकुंद सुरसे, विशाल मच्छिंद्र शिरवळे, विकास रमेश अकोलकर, मयुर श्याम साठे, शुभम ज्ञानदेव सुडके, राकेश ठोकळ,

अमोल दत्तात्रय गोरे, गणेश भुजबळ, रेवनाथ पांडुरंग पोळे यांचा समावेश आहे. करोनाचा प्रभाव कमी झाल्याने यंदा शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याचे नियोजन करण्यात आले होते.

नगर शहरात शनिवारी सकाळपासून शिवजयंती मिरवणूकीची तयारी सुरू केली होती. दरम्यान शासनाने लागू केलेल्या आदेशाचे पालन करण्याच्या सूचना पोलिसांकडून शिवजयंती साजरी करणार्‍या मंडळास देण्यात आल्या होत्या.

मिरवणूकीला परवानगी नाकरण्यात आली होती. भादंवि कलम 149 नुसार पाच मंडळास नोटीसा देण्यात आल्या होत्या. परंतू पोलिसांचा आदेश न जुमानता शिवजयंती मिरवणूक काढण्यात आली.

मिरवणूक काढल्यानंतर कोतवाली व तोफखाना पोलिसांनी या मिरवणूका मध्येच बंद करून साऊंड सिस्टिम जप्त केली व गुन्हे दाखल केले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe