अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :- राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आता ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत.ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakta Tanpure) यांची अंमलबजावणी संचालनालयाने चौकशी सुरू केली असून आज गेल्या सात तासांहून अधिक काळांहून ही ते प्रश्नांची उत्तरे देत आहेत.
राज्य सरकारमधील अनेक मंत्र्यांच्या मागे ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लागला असताना आता आणखी एका मंत्र्याची ईडीने चौकशी केल्यामुळे पुन्हा चर्चांना उधण आलं आहे.
अनिल देशमुख, अनिल परब, एकनाथ खडसे, अर्जुन खोतकर, अशा अनेक नेत्यांमागे सध्या ईडीच्या चौकशीचा फेरा सुरू आहे. त्यात आता प्राजक्त तनपुरेंचीही भर पडली आहे.
राम गणेश गडकरी सहकारी साखर कारखाना कर्ज प्रकरण
राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्याप्रकरणी चौकशी करण्यात आली आहे. महाराष्ट्र को-ओपरेटिव्ह बँकेने काही कारख्यान्यांना कर्ज दिली होती.
त्यात महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेने अहमदनगर येथील राम गणेश गडकरी सहकारी साखर कारखाना कर्ज प्रकरणात जप्त केला होता. या कारखान्याचा नंतर 2012 सालात लिलाव करण्यात आला होता.
सर्व व्यवहारावर ईडीला संशय
हा कारखाना प्राजक्त तनपुरे यांनी विकत घेतला. कारखान्याची मूळ किंमत 26 कोटी होती मात्र, हा कारखाना तनपुरे यांच्या कंपनी ने 13 कोटी रुपयांना विकत घेतला होता.
या सर्व व्यवहारावर ईडीला संशय आहे. या अनुषणगाने ईडी चौकशी करत आहे. आज प्राजक्त तनपुरे यांना समन्स देऊन बोलावण्यात आपलं होतं.
तनपुरे यांच्या विरोधातील कारवाई हे कुठपर्यंत जाणार ?
ईडीने राज्यातील अनेक मंत्र्यांची चौकशी सुरू ठेवली आहे. यात अजित पवार, अनिल परब या दिग्गज मंत्र्यांचा समावेश आहे. याशिवाय खासदार भावना गवळी, आमदार प्रताप सरनाईक, माजी मंत्री एकनाथ खडसे यांनाही न्यायालयीन लढ्याला तोंड द्यावे लागत आहे. काही मंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तींवर छापे पडले आहे. तनपुरे यांच्या विरोधातील कारवाई हे कुठपर्यंत जाणार, याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
कोण आहेत प्राजक्त तनपुरे
तनपुरे हे 2019 मध्ये पहिल्यांदा आमदार झाले व महाविकास आघाडी सरकारमध्ये लगेच मंत्री बनले. ते राहुरी मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून निवडून आले.
त्यांनी भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचा पराभव केला होता. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे ते भाचे आहेत. त्यांच्याकडे ऊर्जाखात्यासोबत उच्च शिक्षण खात्याचे राज्यमंत्रीपद आहे.
प्राजक्त तनपुरे यांचा जन्म 13 सप्टेंबर 1976 रोजी झाला. त्यांनी बी. ई., एमबीए, एमएस या पदव्या घेतल्या आहेत. त्यांनी अमेरिकेतून शिक्षण घेतलं आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजीवर त्यांचं प्रभुत्त्व आहे. ते प्रसाद साखर कारखान्याचे चेअरमनही आहेत.
जनतेतून निवडून आलेले नगराध्यक्ष !
प्राजक्त तनपुरे यांचा राजकीय प्रवास राष्ट्रवादी काँग्रेसमधूनच सुरू झाला. नगरपरिषदेच्या राजकारणापासून त्यांच्या राजकारणास सुरुवात झाली. ते जनतेतून निवडून आलेले नगराध्यक्ष होते.
नगराध्यक्ष म्हणून त्यांनी राहुरी विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामे मार्गी लावले. उच्च शिक्षित असलेल्या तनपुरे यांचा ग्रामीण आणि शहरी भागातील समस्यांचा अभ्यास आहे.
उत्कृष्ट संघटक म्हणूनही ते राहुरीत प्रसिद्ध आहेत. तरुणांना एकत्रित करून त्यांच्या माध्यमातून विकास कामे करण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यामुळेच त्यांना राष्ट्रवादीने विधानसभेच्या रिंगणात उतरवलं होतं.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम