अहमदनगर ब्रेकींग: माजी सैनिकाच्या कुटूंबाला दमदाटी, धक्काबुक्की; तिघांविरुद्ध गुन्हा

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2022 :-  माजी सैनिकाच्या कुटूंबातील सदस्य घराच्या छतावर पतंग उडवित असताना त्याठिकाणी तिघांनी अनाधिकृतपणे प्रवेश करून घरातील महिला व पुरूषांना शिवीगाळ दमदाटी करत धक्काबुक्की केली.

शुक्रवारी सायंकाळी भिंगार उपनगरातील आलमगीर रोडवर द्वारकाधीश कॉलनीत ही घटना घडली. याप्रकरणी प्रभावती दशरथ मुंडे (वय 65 रा. द्वारकाधीश कॉलनी, आलमगीर रोड, भिंगार) यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शोएब, सोहेल (दोघांची पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) व एक अनोळखी यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शुक्रवारी सायंकाळी घराच्या छतावर मकरसंक्रातीनिमित्त कुटूंबातील सदस्य पतंग उडवित होते.

सायंकाळी शोएब, सोहेल व एक अनोळखी यांनी घराच्या छतावर अनाधिकृतपणे प्रवेश केला. फिर्यादी यांना धक्का देत त्यांचा मुलगा वसंत यांना शिवीगाळ, दमदाटी करून ते निघून गेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe