अहमदनगर ब्रेकींग… नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह आढल्याने खळबळ

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2022  Ahmednagarlive24 :- कोपरगाव तालुक्‍यात गोदावरी नदी पत्रात छोट्या पुला जवळ आज दि. १९ मार्च रोजी सायंकाळी ५:४५ वाजेच्या सुमारास अज्ञात महिलेचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली.

प्राप्त माहितीनुसार कोपरगाव गोदावरी पात्रात छोटा पुला जवळ सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास गोदावरी नदीत पात्रात अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला असल्याचे दिसून आले.

घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस पथका सह घटना स्थळी दाखल होऊन गावकरी व तरुणांच्या मदतीने मृतदेह नदीपात्रा बाहेर काढला.

सदर अज्ञात महिलेचे वय ६५ वर्ष असून सदर महिलेचे नाव -लता अशोकराव शिंदे असून ते येवला तालुक्यातील तिन देऊळ येथील असल्याचे तपासात समजते आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोना.बी.एस.कोरेकर हे करत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe