अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2022 AhmednagarLive24 :- येथील तोफखाना पोलीस ठाण्यात अत्याचार, अॅट्रोसिटी कलमान्वये दाखल असलेल्या गुन्ह्यात पंचायत समितीचे माजी सदस्य तथा शिवसेना नेते गोविंद अण्णा मोकाटे याला आज पोलिसांनी अटक केली.
अटकपूर्व जामिन न मिळाल्याने आरोपी मोकाटे आज तोफखाना पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याला अटक करण्यात आली असून दुपारी न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक अजित पाटील या गुन्ह्याचा तपास करत आहेत.
गेल्या काही दिवसांपूर्वी अहमदनगर शहराच्या एका उपनगरात राहणार्या तरूणीने मोकाटेच्या विरोधात तोफखान्यात अत्याचाराची फिर्याद दिली होती.
त्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर त्या गुन्ह्यात वाढीव अॅट्रोसिटीचे कलम लावण्यात आले होते. अॅट्रोसिटी कलम लावण्यानंतर सदरचा गुन्हा तपासकामी ग्रामीण पोलीस उपअधीक्षक पाटील यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
मोकाटेविरोधात अॅट्रोसिटीचे वाढीव कलम लावण्यात आले आहे. मोकाटेविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर राजकीय आरोप-प्रत्योराप झाले आहेत.
गुन्हा दाखल झाल्यानंतर मोकाटे पसार झाला होता. दरम्यानच्या काळात त्याने जिल्हा सत्र न्यायालय आणि औरंगाबाद खंडपीठात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.
अटकपूर्व जामीन न मिळाल्याने अखेर मोकाटे पोलिसांसमोर हजर झाला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून दुपारी न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.