अहमदनगर Live24 टीम, 19 ऑक्टोबर 2021 :- अकोले तालुक्यातील वारंघुशी गावच्या शिवारातून वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात परिसरातून नागरिकांना त्रस्त करून सोडलेल्या बिबट्याला रविवारी जेरबंद करण्यात वन विभागास यश आले.
बऱ्याच दिवसापासून आदिवासी शेतकऱ्यांच्या पशुधनावरच तो हल्ला करून ठार मारून ताव मारत होता. त्यामुळे वारंवार वारंघुशी गावांतून या बिबट्याच्या बंदोबस्ताची मागणी नागरिक करीत होते.

या बिबट्याच्या हल्ल्यात प्रमाणाबाहेर शेतक-यांच्या पशुधनाची हानी झाल्याने बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी जोर धरु लागली. यासाठी वारंघुशी गावातील सामाजिक कार्यकर्त्यांकडून सातत्याने वनखात्याकडे पाठपुरावा करण्यात येत होता.
अखेर तीन दिवसांपुर्वी वारंघुशी गावाबाहे आदमखोर बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला. त्यासाठी पिंज-यात त्याला आमिष म्हणून एक कुत्रे ठेवण्यात आले. अखेर रविवारी (१७ आॅक्टोबर) पहाटे या हल्लेखोर बिबट्यास पिंजऱ्यात जेरबंद करण्यात यश आले.
बिबट्याला जेरबंद झाल्याची माहीती समजताच तेथे बघ्यांनी एकच गर्दी केली होती. या बिबट्यास संगमनेर येथील निंबाळे येथील वन विभागाच्या रोपवाटिकेत हलवण्यात आले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम