अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :- श्रीरामपूर तालुक्यातील बेलापुर येथील एका राहत्या घरामध्ये गॅसचा स्फोट झाल्याने ४ जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली आहे. यासंदर्भात जखमींना पुढील उपचारासाठी प्रवरानगर हॉस्पिटल मध्ये हलविण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीरामपूर तालुक्यातील बेलापुर येथे गाढे गल्लीमध्ये शशिकांत शेलार हे भाड्याने राहतात. शेलार हे औषधाचा व्यवसाय करतात.
गुरुवारी सकाळी साडेसहा वाजता ज्योती शेलार यांनी शेगडी पेटविली असता अचानक स्फोट झाला, त्यावेळी शेलार यांच्या घरातील शशिकांत शेलार (वय ४३), ज्योती शेलार (वय ३८), यश अशोक शेलार (वय १६),
– (वय ८) हे चौघे जण भाजून गंभीर जखमी झाले आहे. हा स्फोट एवढा मोठा होता की शेलार यांच्या घराच्या छताचे पत्रे उडून बाजूला पडले.
स्फोटाच्या आवाजाने परीसरातील आजूबाजूचे लोक मदतीला धावले व त्यांनी शेलार परिवाराला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
आगीमध्ये भाजलेल्या शेलार परिवाराला प्रवरानगर येथील रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर पुढील उपचार चालु आहे. सध्या जखमींची प्रकृती स्थिर आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम