अहमदनगर ब्रेकिंग : ग्रामपंचायतचे सदस्याची आत्महत्या !

Published on -

अहमदनगर Live24 टीम,  20 फेब्रुवारी 2022 :-  नगर तालूक्यातील निंबळक ग्रामपंचायतचे सदस्य गणेश कोंडीबा कोतकर यांनी ३१ जानेवारी २०२२ रोजी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली होती.

कोतकर यांनी उसने दिलेले पैसे न मिळाल्यामुळे आत्महत्या केल्याची बाब समोर आल्यामुळे पोलिसांनी उपसरपंच बाळासाहेब कोतकर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

तो फरार आहे. ग्रामपंचायत सदस्य गणेश कोतकर यांच्याकडून उपसरपंच बाळासाहेब कोतकर यांनी पैसे उसने घेतले होते. गणेश यांनी मागणी करूनही त्यांना पैसे मिळाले नाही. त्यामुळे ते मानसिक तणावात होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe