अहमदनगर ब्रेकिंग ; जिल्ह्यातील ‘हे’ गाव सात दिवस लॉकडाऊन !

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 30 सप्टेंबर 2021 :-  कोरोना पेशंटची संख्या वाढल्याने बेलापूर खुर्द गाव सात दिवस बंद ठेवण्याचा निर्णय कोरोना समीतीने घेतला असुन तहसीलदार प्रशांत पाटील यांनी बेलापुर खूर्द रेड झोनमध्ये येत असल्या कारणाने गाव बंद ठेवण्याच्या सुचना दिलेल्या आहेत

तसेच व्यवसायीकांनी दुकाने सुरु ठेवण्याची केलेली मागणी अमान्य करण्यात आली बेलापुर खुर्द या गावात जवळपास दहा कोरोना रुग्ण असुन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढु नये त्या करीता गाव सात दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असुन गावात प्रवेश करणारे सर्व रस्ते बँरेकेट्स लावून बंद करण्यात आले आहे

गावातील सर्व दुकाने अत्यावश्यक सेवाही पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे गावातील व्यवसायीकांनी दुकाने सुरु ठेवण्याची मागणी केली होती देवाण घेवाण वाढल्याने कोरोनाचा प्रसार होवू शकतो त्यामुळे सर्व व्यवसायीकांनी आपापले व्यवहार बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत

तहसीलदार प्रशांत पाटील यांनीही बेलापुर खूर्द या गावात रुग्ण वाढत असल्यामुळे नागरीकांनी आपली काळजी आपणच घ्यावी मास्क वापरा हात साबणाने स्वच्छ धुवा गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा बाधीत व्यक्तींनी घरी न थांबता दवाखान्यात दाखल व्हावे असे अवाहनही तहसीलदार पाटील यांनी केले आहे

बेलापूर खुर्द गावामध्ये कोरोना चे पेशंट वाढले असल्याने प्रशासनाने गाव सात तारखेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले असून बेलापूर खुर्द गावातील सर्व व्यापारी व दुकानदारांनी तहसीलदार प्रशांत पाटील यांना व्यवसाय सुरू ठेवण्यात यावे अशी विनंती केली तसे निवेदनही देण्यात आले होते .

याप्रसंगी उपसरपंच ॲड. दीपक बारहाते, हरिहर केशव गोविंद संस्थांचे अध्यक्ष बाळासाहेब हरदास, दुकानदार सुधाकर बारहाते, श्याम बडदे, जगन्‍नाथ भगत आदी उपस्थित होते. बेलापुर खूर्द गावात आत्तापर्यत १५ रुग्ण आढळून आले असुन काही रुग्ण बरे झालेले आहेत बरेच रुग्ण घरीच उपचार घेत आहेत

हे चुकीचे असले तरी काही रुग्ण ऐकण्याच्या मनःस्थितीत नाहीत .गावात रँपीड टेस्ट करण्यात आल्या असुन रुग्ण असणाऱ्या परिसरात विशेष खबरदारी घेत आहे अशी माहीती डाँक्टर देविदास चोखर आरोग्याधिकारी बेलापुर प्राथमिक आरोग्य केंद्र यांनी दिली आहे

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe