Ahmednagar Breaking : शेतकऱ्याचा शेतातच निर्घृण खून, अहमदनगरमधील ‘या’ गावातील घटना

Published on -

Ahmednagar Breaking :  अहमदनगरमधून खुनासंदर्भात वृत्त आले आहे. भुईमुगाच्या शेंगाचे राखण करणाऱ्या एका शेतकऱ्याचा निर्घृण खून करण्यात आलाय.

शिराळ (ता. पाथर्डी) येथील गडाख वस्तीजवळ लहानू गोपाळा पालवे (वय ५५, रा. सोकेवाडी, ता. नगर) या शेतकऱ्याचा खून करण्यात आला. ही घटना शुक्रवारी (ता.१४) उघडकीस आली.

पालवे यांची शेती शिराळ येथील गडाख वस्तीजवळ आहे. दहा-पंधरा दिवसांपासून ते शेतातील भुईमुगाच्या शेंगाचे राखण करण्यासाठी रहात होते. गुरुवारी रात्री अज्ञात व्यक्तीने त्यांना जबर मारहाण केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

मारहाणीमध्ये पालवे यांच्या तोंडाला, पाठीला व पायाला मार लागल्याचे आढळून आले आहे. शुक्रवारी सकाळी आठ वाजता ही घटना शिराळ येथील गडाख वस्तीच्या नागरिकांच्या लक्षात आली आणि त्यानंतर त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली.

शिराळ येथे शेतकऱ्याचा खून झाल्याची माहिती समजताच अप्पर पोलिस अधीक्षक शिवपुंजे, डीवायएसपी सुनील पाटील, पाथर्डीचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे, उपनिरीक्षक विलास जाधव, जगदीश मुलगीर यांच्यासह मिरी पोलिस आउट पोस्टचे हवालदार विजय भिंगारदिवे,

पोपट आव्हाड, विनोद मासाळकर यांच्यासह संपूर्ण पोलिस फाटा घटनास्थळी दाखल झाल्यानंतर शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आलेख वाढतच चालला आहे. दरोडे, हाणामाऱ्या आदी घटना सुरु असतानाच आता थेट खुणांसारख्या घटना घडू लागल्या आहेत.

अलीकडील काहीमहीन्यांचा विचार करता खुनासारख्या अनेक अप्रिय घटना घडल्या आहेत. खाकीचा धाक संपला की काय अशी चर्चा आता नागरिक करू लागले आहेत. दरम्यान या शेतकऱ्याच्या खुनामुळे एकच खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News