AhmednagarLive24 : येथील बिग मी इंडिया कंपनीकडून आर्थिक गुंतवणूकदारांची सुमारे पावणे आठ कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे.
सोनिया सोमनाथ राऊत, वंदना चंद्रकांत पालवे, प्रितम मधुकर शिंदे व शलमन दावीत गायकवाड अशी त्यांची नावे आहेत.

accused-arrested-in-shirdi-crime branch
नगरच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने मंगळवारी ही कारवाई केली. या कंपनीमार्फत सात कोटी ७६ लाखांची फसवणूक झाल्याची तक्रार कोल्हापूर येथील सतीश खोडवे यांनी २०२१ मध्ये तोफखाना पोलिस ठाण्यात दिली आहे.
यामध्ये कंपनीचा प्रमुख सोमनाथ राऊत याला अटक झाली आहे. इतरांनी अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न केले होते. मात्र, यश आले नाही. त्यानंतर आता चौघांना अटक करण्यात आली.