अहमदनगर ब्रेकिंग : पत्रकाराची लॉजवर आत्महत्या ! मृतदेहाचा सांगाडा शिल्लक…

Ahmednagarlive24 office
Published:

AhmednagarLive24 : संगमनेर शहरातील एका लॉजवर एका व्यक्तीने स्वत:च्या आयुष्याला कंटाळून जाळुन घेतले. तो इतका जळालेला होता. की, निव्वळ त्याचा सांगाडा शिल्लक राहिला होता. जेव्हा लॉजच्या रुममधून धुरांचे लोळ बाहेर पडू लागले तेव्हा हा प्रकार समोर आला.

ही घटना शुक्रवार दि. 3 जून 2022 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली. यात सागर रघुनाथ ठाकरे असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. जेव्हा ही घटना घडली तेव्हा पोलिस घटनास्थळी गेल्यानंतर त्याच खोलीत तब्बल 15 दारुच्या बाटल्या मिळून आल्या

या तरुणाने एका चिठ्ठी लिहीली असून त्यात कौटुंबिक काही बाबी देखील त्याने मांडल्या असून त्यात त्याने आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सागर ठाकरे याचे घुलेवाडी येथील एका तरुणीशी लग्न झाले होते.त्याच्या कुटुंबात कलह सुरूच होता. तो गेल्या काही दिवसांपुर्वी संगमनेर येथे आला होता.

तो एका वृत्तपत्रात गेल्या काही दिवसांपासून काम करत होता. तसे त्याच्याकडे पत्रकारीतेचे आयकार्ड देखील होते. मात्र, तो आता धुळे सोडून नाशिक येथे कामानिमित्त स्थायिक होणार होता. तो दि. 27 मे 2022 रोजी सासरवाडी येथे गेला होता.

मात्र, तेथे काय झाले याबाबत पोलिसांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. तसेच तो नाशिकला जातो असे सांंगून संगमनेरातच एका लॉजवर राहिला. त्याच्या मनात प्रचंड अस्थिरता होती. त्याला कोणापासून तरी नक्कीच त्रास होत होता. मात्र, तरी देखील मद्याचा सहारा घेऊन तो सर्व दु:ख गिळत असल्याचे प्राथमिक मत समोर येऊ लागले आहे.

दरम्यान, दि. 3 जून 2022 रोजी सकाळी संबंधित लॉजमधून धुरांचे लोळ बाहेर पडू लागले. त्या रुमला पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे, तेथील कर्मचार्‍यांनी तत्काळ दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. काही काळ लाथा मारल्यानंतर दरवाजा तुटला तर आत आग्नीतांडव सुरू होता.

तेव्हा लॉजवर काम करणार्‍या तरुणांनी प्रसंगावधान राखत पाण्याच्या बादल्या आणल्या आणि आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार सकाळी 10 वाजण्याच्या सुमारासचा असावा. जेव्हा दरवाजा तोडून पाणी आणले तोवर जवळ असणार्‍या सर्व वस्तू जळून खाक झाल्या होत्या.

मृतदेहाच्या अंगावरील कपडे जळून बर्‍यापैकी बॉडी जळालेली होती. तरी देखील कर्मचार्‍यांनी मोठ्या धाडसाने त्यास वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, हे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe