अहमदनगर ब्रेकिंग : खा. सुजय विखे यांना कोरोनाची लागण! म्हणाले काळजी….

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 03 जानेवारी 2022 :-  अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.सुजय विखे यांना कोरोनाची लागण झाली असून स्वतः खा.विखे यांनी फेसबुकवर पोस्ट करून ही माहिती दिली आहे.(MP Sujay Vikhe)

माजी मंत्री तथा राहता विधानसभा मतदार संघाचे लोकप्रतिनिधी आ.राधाकृष्ण विखे पाटील यांना कोरोनाची लागण झाली असताना त्यांचे सुपुत्र खा. सुजय विखे यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.

फेसबुक पोस्ट मध्ये खा.विखे यांनी म्हंटले आहे. काळजी करण्याचे कारण नाही परंतु खबरदारी म्हणून मी स्वतः विलगिकरणात जात आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोनाची टेस्ट करावी व काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe