AhmednagarLive24:- शहरातील सीए ऑफिससमोर एका 40 वर्षीय पुरूषाचा मृतदेह आढळून आला आहे. नवनाथ लोखंडे असे त्याचे नाव आहे.
दरम्यान त्याच्या नातेवाईकांचा शोध लागला नसून याबाबत कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी तोफखाना पोलिसांशी संपर्क साधावा, असे आव्हान पोलीस हवालदार सुनील शिरसाठ यांनी केले आहे.

5 मे, 2022 रोजी नवनाथ लोखंडे सीए ऑफिससमोर जखमी अवस्थेत आढळून आल्याने त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.
उपचारादरम्यान त्याचे निधन झाले आहे. त्याच्या नातेवाईकांचा शोध लागला नसून याबाबत कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आव्हान करण्यात आले आहे.