अहमदनगर ब्रेकींग: अल्पवयीन मुलीवर आळीपाळीने अत्याचार; एकाच कुटूंबातील चौघांवर…

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2022 Ahmednagarlive24  :- घरी कोणी नसताना अल्पवयीन मुलीवर घरातच अत्याचार केल्याची घटना अहमदनगर शहरात घडली. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात सिल्वर चव्हाण, वरगा सिल्वर चव्हाण, सुनील सिल्वर चव्हाण, अनिल सिल्वर चव्हाण यांच्याविरूध्द अत्याचार, पोक्सो आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित अल्पवयीन मुलीने फिर्याद दिली आहे. पीडिता तिच्या आई-वडील आणि भावासह अहमदनगर शहरात वास्तव्यास आहे. पिडीतेचा भाऊ आणि अनिल चव्हाण यांचे दारू पिण्यावरून भांडणे झाली होती.

त्यावरून अनिल चव्हाण याने पिडीतेच्या आईला दगडाने मारहाण केली होती. पिडीतेची आई मारहाणीत गंभीर जखमी झाली असून तिच्यावर शहरातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

पीडिता रविवारी शेळ्या चारून दुपारी घरी आली. त्यानंतर तिने जेवण तयार करून तिच्या आईला डब्बा रूग्णालयात पोहोच केला.

त्यानंतर पीडितेच्या वडिलांनी तिला दुचाकीवरून घरी सोडले. रात्रीच्यावेळी पिडीता झोपलेली असताना सिल्वर चव्हाण, वरगा चव्हाण, सुनील चव्हाण आणि अनिल चव्हाण हे चौघेही पिडीतेच्या घरी आले.

त्यानंतर आरोपी सिल्वर चव्हाण आणि त्याची बायको वरगा चव्हाण यांनी पिडीतेचे हात धरले असता सुनील आणि अनिल चव्हाण यांनी पीडितेवर आळीपाळीने अत्याचार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe