Ahmednagar Breaking : नगर अर्बन बँकेची एकरकमी परतफेड योजना सुरू, जाणून घ्या सविस्तर

Ahmednagarlive24 office
Published:
nagar urban

Ahmednagar Breaking : रिझर्व बँकेने नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा बँकिंग परवाना रद्द केल्यानंतर केंद्र शासनाने बँकेवर नोव्हेंबर २०२३ मध्ये अवसायक म्हणून एनसीडीसीचे उपसंचालक गणेश गायकवाड यांची नियुक्ती केली होती. दरम्यान, सात महिन्यांच्या कालावधीमध्ये सात जून अखेर बँकेच्या एकुण कर्जापैकी रुपये १६ कोटी ७० लाख वसूल करण्यात आले आहेत.

मात्र, थकीत कर्ज वसुलीला गतिमान करण्यासाठी बँक प्रशासनाने केंद्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार एकरकमी कर्ज परतफेड योजना ५ जून २०२४ पासून सुरू करण्यात आली असल्याचे अवसायक तथा एनसीडीसीचे उपसंचालक गणेश गायकवाड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात १७२०० ठेवीदारांचे रुपये २९३.५७ कोटी डीआयसीजीसीच्या (भारतीय रिझर्व्ह बँक) माध्यमातून परत करण्यात आले असून १५८५७ ठेवीदारांच्या क्लेम फॉर्मची पूर्तता झालेली असून त्यांचे रुपये ६१.८१ कोटी डीआयसीजीसीच्या (भारतीय रिझर्व्ह बँक) माध्यमातून लवकरच परत करण्यात येणार असून त्याचे काम अंतिम टप्यात आलेले आहे.

या एकरकमी कर्ज परतफेड योजनेमुळे कर्जदार स्वतःहून मोठ्या प्रमाणात कर्ज थकबाकी भरून आपले कर्ज खाते निल करण्याच्या दृष्टीने पुढे येतील, अशा विश्वास अवसायक गायकवाड यांनी व्यक्त केला.या योजनेमुळे मोठ्या प्रमाणात थकीत कर्ज वसुली होऊन रक्कम ठेवीदारांच्या ठेवी परत करण्याचा मार्ग सुलभ होणार आहे.

त्यामुळे सर्व थकीत कर्जदारांनी या एक रकमी परतफेड (ओटीएस) योजनेचा लाभ घेऊन संभाव्य कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी आपली थकबाकीची रक्कम लवकरात लवकर भरून बँक प्रशासनास सहकार्य करावे, त्याचबरोबर सर्व खातेदार व ठेवीदार यांनी आपापले केवायसी कागदपत्र नजीकच्या शाखेत जमा करून ठेवी परत मिळवण्यासाठी क्लेम फॉर्म देखील लवकरात लवकर भरून द्यावेत,

असे आवाहन देखील अवसायक गायकवाड यांनी केले आहे. थकीत कर्जाची वसुली करून ठेवीदारांना त्यांचे कष्टाचे पैसे परत करण्यासाठी बँक प्रशासन प्रयत्नशील असल्याचे देखील यावेळी गायकवाड यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe