अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- नगर शहरातील यशवंत लॉजवर पोलिसांनी छापा टाकून दोन महिलांची सुटका केली आहे. तोफखाना पोलिस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी ,सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान सोळंके यांच्यासह पोलीस पथकाने हि कामगिरी केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, हॉटेल यशवंत मध्ये काही महिलांना देह व्यापार करण्यास प्रवृत्त करण्यात येत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती.

file photo
या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून नगर शहरातील यशवंत लॉज वर छापा टाकून देह विक्री करण्यासाठी आणलेल्या दोन महिलांची सुटका करण्यात आली आहे.
पोलीस उपाधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे. तोफखाना पोलिस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी,सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान सोळंके यांच्या पथकाने हि कारवाई केली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम