अहमदनगर ब्रेकींग: गळा दाबून व विष पाजून घेतला जीव; ‘त्या’ विवाहितेच्या मृत्यूचे कारण आले समोर

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar Breaking

अहमदनगर Live24 टीम, 04 एप्रिल 2022 AhmednagarLive24  : येथील विनायकनगरच्या समता कॉलनीत घरामध्ये संशयितरित्या मृतअवस्थेत आढळून आलेली विवाहिता सरोज रवी उपाध्ये (वय 30 रा. विनायकनगर, अहमदनगर) हिचा गळा दाबून व विषारी औषध पाजून खून करण्यात आला

असल्याचे जिल्हा रूग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या शवविच्छेन अहवालातून समोर आले आहे. यामुळे कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात वाढीव खूनाच्या गुन्ह्याचे कलम लावण्यात आले आहे.

अशोककुमार नंदकिशोर तिवारी (वय 37 रा. दिल्ली, मुळ रा. राजस्थान) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपीमध्ये सरोजचा पती रवी मुरलीधर उपाध्ये, सासरे मुरलीधर हुकुमचंद उपाध्ये, सासू परमा मुरलीधर उपाध्ये व नणंद पुजा सुनील जोशी (सर्व रा. विनायकनगर) यांचा समावेश आहे.

पती रवी उपाध्ये याला अटक करण्यात आली आहे. त्यांनी सरोजचा गळा दाबून व विषारी औषध पाजून जीव घेतल्याचे समोर आल्यानंतर आरोपीविरूध्द खूनाच्या गुन्ह्याचे वाढीव कलम लावण्यात आले आहे. या गुन्ह्याचा तपास कोतवालीचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे करीत आहेत.

सरोजचा विवाह सन 2012 मध्ये रवी उपाध्ये याच्यासोबत झाला होता. वर्षभर सासरच्या लोकांनी सरोजला चांगले नांदविले. यानंतर तिला वेळोवेळी शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण करण्यात आली होती.

माहेरून गाडी घेण्यासाठी पैसे आणावे म्हणून शिवीगाळ, मारहाण केले. 28 मार्च, 2022 रोजी सरोज मृतअवस्थेत आढळून आली होती.

यानंतर तिच्या मृतदेहाचे जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. सुरूवातीला पती, सासू-सासरे व नणंद यांच्याविरोधात आत्महत्येप्रवृत्त करणे व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता वाढीव खूनाचे कलम लावण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe