अहमदनगर Live24 टीम, 04 नोव्हेंबर 2021 :- राहुरी तालुक्यातील संक्रापूर शिवारात राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्याने बदामाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवार ३ नोव्हेंबर रोजी घडली आहे.
साखराम कारभारी खेमनर हे कोपरगाव येथे राज्य उत्पादन शुल्क विभागात सहायक दुययम निरीक्षक पदावर कार्यरत होते. त्यांनी संक्रापूर शिवारात आपल्या घराजवळ असलेल्या

file photo
बदामाच्या झाडाला फाशी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली आहे. त्यांच्या मृतदेह लोणी येथे नेण्यात आला असून शवविच्छेदन करण्यात येणार आहे.
दरम्यान रात्री उशिरापर्यंत पोलिसात कुठल्याही गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम