अहमदनगर ब्रेकिंग ! कर्जत जवळ बिबट्याचा मृतदेह आढळला

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2021 :- कर्जत तालुक्यातील रजपूतवाडी शिवारातील बुवासाहेब मळा याठिकाणी आज बिबट्याचा मृतदेह आढळला. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मरण पावलेला बिबट्या याचे वय अंदाजे चार वर्ष असावे, त्याच्या शरीराची पूर्ण वाढ झालेली दिसून येते त्याच्या मृत्यूचे कारण नैसर्गिक आहे.

त्याला कोठेही जखम झालेली नाही याबाबत अधिक माहिती अशी कि, कर्जत तालुक्यातील रजपूतवाडी शिवारातील व बुवासाहेब मळा परिसरात परशुराम परदेशी हा शेतकरी शेतामध्ये जनावरांसाठी चारा आणण्यासाठी गेलेले असताना

त्याना दुर्गंधीयुक्त वास आला. कशाचा वास येत आहे, कोणते जनावर मेले की काय हे पाहण्यासाठी तो त्या दिशेने गेला असता समोर दिसलेले दृश्य पाहून परशुराम परदेशी हादरून गेला.

उसाच्या शेतात त्यांना बिबट्या दिसला. जवळ जाऊन पाहिले असता तो बिबट्या मेलेला असल्याचे लक्षात आले. आणि त्याचीच दुर्गंधी पसरली होती.

याबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली आहे. दरम्यान या परिसरामध्ये बिबट्याचा वावर यापूर्वी होता हे आता स्पष्ट झाले असून

याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर समजून येईल. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी मोहनराव शेळके हे घटनास्थळी पथकासह पोहचले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe