अहमदनगर ब्रेकींग: ‘या’ प्रसिध्द संस्थेच्या चेअरमनची फेसबुकवर बदनामी

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :- भाऊसाहेब एन. शिंदे या नावाने फेसबुकचे खाते असलेल्या व्यक्तीने नागेबाबा पतसंस्थेचे चेअरमन कडूभाऊ काळे यांची फेसबुकवर बदनामी केल्याची घटना घडली आहे.

याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात फेसबुकवर भाऊसाहेब एन. शिंदे या नावाने पोस्ट करणार्‍या व्यक्तीविरूध्द अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कडूभाऊ काळे यांनी तक्रार दिली आहे. भाऊसाहेब एन. शिंदे या नावाने फेसबुकचे खाते असलेल्या व्यक्तीने चेअरमन कडूभाऊ काळे यांच्याविषयी वाईट भाषेत लिखाण करून पोस्ट केली.

त्यांच्या घरच्यांविषयी वाईट भाषेत फेसबुकवर लिखाण केले आहे. तसेच फेसबुकवर पोस्ट करून शिवीगाळ, दमदाटी करून कडूभाऊ काळे व नागेबाबा पतसंस्थेची बदनामी केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

फेसबुकवर बदनामीकारक मजकूर टाकल्याचा प्रकार लक्षात येताच कडूभाऊ काळे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe