टोळक्याकडून हॉटेल मालकावर तलवार कोयत्याने सपासप वार, अनेक कर्मचारी गंभीर जखमी, काहींची प्रकृती चिंताजनक

अहमदनगरमधील हॉटेलवरून काल झालेला राजकीय लोकांमधील वादाची घटना ताजी असतानाच आता आणखी एक मोठी घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे. जेवणावरून, बिलावरून झालेल्या वादामुळे हॉटेल मालकावर एका टोळक्याने थेट तलवार कोयत्याने सपासप वार केल्याची घटना घडली आहे.

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar Crime

Ahmednagar Breaking : अहमदनगरमधील हॉटेलवरून काल झालेला राजकीय लोकांमधील वादाची घटना ताजी असतानाच आता आणखी एक मोठी घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे. जेवणावरून, बिलावरून झालेल्या वादामुळे हॉटेल मालकावर एका टोळक्याने थेट तलवार कोयत्याने सपासप वार केल्याची घटना घडली आहे.

हॉटेल मालक यात गंभीर जखमी झालेआहेत. या टोळक्याचा थरार सीसीटीव्हीत देखील कैद झाला आहे. ही घटना पारनेर तालुक्यातील निघोज – वडगाव रस्त्यावरील हॉटेल जत्रावर घडला.

या हल्ल्यात हॉटेल मालकासह इतरही कर्मचारी गंभीर जखमी झाले असून जखमींवर नगरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान यातील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सध्या समजली आहे. गणेश भुकन, प्रवीण भुकन यांच्यासह हॉटेलमधील कर्मचारी जखमी असून उपचार सुरु आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की, निघोज – वडगाव रस्त्यावर हॉटेल जत्रा आहे.

मंगळवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास यावेळी दारूच्या नशेत असणाऱ्या पाच ते सात लोकांनी मालक प्रदीप भुकन यांच्यावर तलवार, कोयता यांच्या साहाय्याने वार केले. यात त्यांच्या हातावर आणि पायावर वार करण्यात आल्याने ते गंभीर जखमी झाले.

हॉटेलचेही नुकसान झालेय. या घटनेत गणेश भुकन, प्रविण भुकन यांच्यासह हॉटेलमधील कर्मचारी यांना मोठी दुखापत झाली असून त्यांचावर उपचार सुरु आहेत. यात काहींची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती समजत आहे.

दरम्यान या प्रकरणानंतर नातेवाईकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. हल्लेखोरांवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.

तालुक्यातील अशा घटना वाढत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण असून अशी हत्यारं आरोपींकडे येतात कशी याबाबत सध्या नागरिक प्रश्न उपस्थित करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe