अहमदनगर ब्रेकिंग : अखेर ‘त्या’ शेतकऱ्याचे शीर दुसऱ्या दिवशी सापडले

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 19 ऑक्टोबर 2021 :- अकोले तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथील शेतकरी भाऊसाहेब दाजिबा तोरमल (५५) यांनी शेजारील गणोरे गावचे हद्दीत धामोडी शिवारात आपल्या घराजवळ एका विहिरीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी घडली होती.

रविवारी त्यांचे धड नसलेले शरीर सापडले. मात्र शीर सापडत नव्हते. रविवारी रात्री उशिरापर्यंत विहिरीच्या पाण्यात शोधाशोध केली. मात्र शीर काही सापडले नव्हते.

रात्री उशीरा ही मोहीम थांबली पण सोमवारी सकाळी पुन्हा शोधाशोध सुरू केली. सकाळी नऊ वाजेच्या सुमारास रंगनाथ उघडे व इतर गोताखोरांनी हे शीर शोधून काढले.

घटनास्थळी उपनिरीक्षक भूषण हांडोरे, काॅन्स्टेबल गणेश शिंदे, आत्माराम पवार, विजय खुळे, रवींद्र वलवे यांनी पाहणी केली. पोलिसांना पुरुषाचे मुंडके नसलेले शरीर सापडून आले.

नंतर ते पिंपळगाव निपाणी येथील शेतकरी भाऊसाहेब दाजिबा तोरमल यांचे असल्याची माहिती मिळाली. पोलिसांकडून मृत व्यक्तीचे शीर शोधण्याचा प्रयत्नही झाला पण बराच वेळ शोधाशोध करूनदेखील शीर आढळून आले नाही.

अंधार पडल्याने शोधकार्यात अडथळा आल्यानंतर रविवारी तपासकाम थांबले. सोमवारी सकाळी रंगनाथ उघडे व इतर गोताखोरांनी हे शीर सापडून काढले.

हा घातपाताचा प्रकार नसून मृत भाऊसाहेब तोरमल यांनी आत्महत्या केल्याचे स्पष्टीकरण पिंपळगाव निपाणीचे पोलिस पाटील संतोष वाकचौरे यांनी केले. शवविच्छेदनानंतर धड व शीर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News