अहमदनगर ब्रेकिंग ! दिवंगत माजी खा. दिलीप गांधींच्या प्रतिमेला चपलांचा मार, पायाखाली तुडवले !

Published on -

नगर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचा घोटाळा राज्यात गाजला. परंतु आता बँकेतील ठेवीदार अत्यंत संतप्त झाले आहेत. संतप्त झालेल्या ठेवीदारांनी दिवंगत माजी खा. दिलीप गांधींच्या प्रतिमेला भरचौकात चपलांचा मार दिला. त्यानंतर ही प्रतिमा पायाखाली तुडवल्याचा प्रकार झाला. बोगस कर्ज प्रकरणास कारणीभूत असल्याच्या आरोपातून ठेवीदारांनी हे कृत्य केले असल्याचे बोलले जात आहे.

बँकेतील गैरप्रकारावर ठेवीदार संतप्त

नगर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचा घोटाळा समोर आला. सध्या यातील अनेक बाबींचा उलगडा होत आहे. याचा फॉरेन्सिक रिपोर्ट देखील आला आहे. दरम्यान या गैरप्रकारामुळे रिझर्व बँकेने बँकेचा परवाना रद्द करून अवसायकाची नियुक्ती केली आहे.

नुकताच बँकेच्या ठेवीदारांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर व स्व.दिलीप गांधी यांच्या घरासमोर आसूड मोर्चा काढला होता. पण आज सोमवारी बँकेच्या ठेवीदारांनी हा आक्रमक पवित्रा घेतल्याने एकच खळबळ उडाली.

लालटाकी येथे बैठक, अन संतप्त ठेवीदारांचे खळबळजनक कृत्य

नगर अर्बन बँक ही दीडशे कोटींच्या बनावट कर्ज प्रकरणामुळे अशा अवस्थेत आली असल्याचे बोलले जात आहे. मुळे ठेवीदारांच्या कोट्यवधींच्या ठेवी अडकल्या असून त्या मिळत नाहीयेत. यासाठी वारंवार आंदोलने करूनही हाती काहीच लागेना. यासंदर्भात आज, सोमवारी ठेवीदारांची लालटाकी येथे बैठक सुरु होती.

त्यानंतर हे सगळे पोलीस अधीक्षक कार्यालयात अधिकाऱ्यांशी चर्चा करायला गेले. पण काहीच समाधान न झाल्याने आक्रमक ठेवीदारांनी बँकेकडे मोर्चा वळविला. बँकेत जाऊन बँकेचे अध्यक्ष तथा दिवंगत खासदार स्व. दिलीप गांधी यांचा फोटा तेथून काढून टाकला.

तो फोटो घेऊन आंदोलक बँकेसमोरील चौकात आले व चपलेने मारले. त्यानंतर संतापलेल्या काही जणांनी स्व. गांधी यांच्या फोटोवर चपलांचा पाय ठेवून फोटो पायाखाली तुडवत मोडला.

बँकेत यांचा फोटो ठेवण्याच्या लायकीचे गांधी नाहीत !

यावेळी आंदोलकांनी बँकेत यांचा फोटो ठेवण्याच्या लायकीचे गांधी नाहीत,असा संताप व्यक्त करताना सर्व संचालकांचा धिक्कार केला. आजी-माजी संचालकांनी ही केचे वाटोळे केलेले असून आगामी काळामध्ये या सर्वानाच ठेविदारांच्या रोषाला सामोरे जावे लागलं की काय अशी भीती व्यक्त केली जात  आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!