अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2021 :- नगरकरांसाठी धडकी भरवणारी बातमी समोर आली आहे. नायझेरिया येथून श्रीरामपुरात आलेल्या आई व मुलाचा करोनाचा अहवाल पॉझिटीव्ह आला असुन त्यांचेवर श्रीरामपुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.(ahmednagar corona)
या दोघांचेही सॅम्पल ओमियोक्रॉन तपासणीसाठी नगर व पुणे येथे पाठविण्यात आले आहे. . दरम्यान याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नायझेरियाहून आलेली 40 वर्षीय आई व तिचा सहा वर्षाचा मुलगा हे दोघे श्रीरामपूर येथे शहरातील शिवाजीरोड परिसरात आले.
याबाबतची माहिती वैद्यकीय विभागास मिळताच त्यांनी या दोघांची करोना चाचणी केली असता या दोघांचेही अहवाल करोना पॉझिटीव्ह आले.
त्यानुसार या दोघांनाही उपचारासाठी श्रीरामपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या काळात या दोन रुग्णांचा ज्या ज्या नातेवाईक अथवा व्यक्तींशी संपर्क आला त्या सर्वांचीही करोना तपासणी करण्यात आली असता या सर्वांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.
त्यामुळे त्यांना घरातच थांबून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या मायलेकांची ओमियोक्रॉन सॅम्पल तपासणीसाठी नगर व पुणे येथे पाठविण्यात आले आहेत. हे अहवाल लवकरच मिळणार असल्याची माहिती श्रीमती देशमुख यांनी दिली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम