अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2022 :- महिलेने स्वतःला पेटवून घेत घराच्या दुसऱ्या मजल्यावरुन उडी मारली आहे. पुजा मनोहर चुग (वय ३३ रा. तारकपूर) असे जखमी महिलेचे नाव आहे. अहमदनगर शहरातील तारकपूर भागात आज सकाळी ही घटना घडली.
जखमी महिलेला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुजा चुग यांनी कोणत्या कारणातून पेटवून घेतले याची माहिती समोर आली नसून पोलीस तपास करत आहेत.

पुजा आज सकाळी घरातील दुसऱ्या मजल्यावर असताना त्यांनी पेटवून घेतले. काही कळायच्या आत ही महिला ओरडत आपल्या घरावरील दुसऱ्या मजल्याच्या गच्चीवरून उडी मारली.
हे चित्र अनेक नागरिकांनी पाहिले. दुसऱ्या मजल्यावरुन पडल्यामुळे पुजा यांच्या डोक्याला मार लागला आहे. त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र पुजा यांनी पेटून का घेतली याबाबत अद्याप कोणते कारण समोर आलेले नसून पोलीस शोध घेत आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम