अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2021 :- बेकायदेशीररित्या गावठी कट्टे व जिवंत काडतुसे घेऊन अहमदनगर शहरात फिरणाऱ्या दोन तरूणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली.
गणेश अरूण घोरपडे (वय ३५), राहुल श्रीरंग अडागळे (वय ३० दोघे रा. सिद्धार्थनगर, अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत. अहमदनगर शहरातील अहमदनगर काॅलेज जवळ मंगळवारी रात्री पोलिसांनी ही कारवाई केली.
त्यांच्याकडून ५५ हजार ६०० रूपये किंमतीचे देशी बनावटीचे दोन गावठी कट्टे, दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस शिपाई कमलेश पाथरूट
यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून घोरपडे व अडागळे विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने ही कारवाई केली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम