AhmednagarLive24 : शाळेत गेलेल्या अल्पवयीन (वय 14) मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेण्याची घटना भिंगार शहरात घडली. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. ही घटना 17 जून रोजी सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेपाच वाजेच्यादरम्यान घडली आहे.

फिर्यादी यांची मुलगी 17 जून रोजी सकाळी शाळेत जाण्यासाठी बाहेर पडली. ती सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत घरी न आल्याने फिर्यादी यांनी तिचा शोध घेतला. ती मिळून न आल्याने शेवटी फिर्यादी यांनी पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी फिर्याद दिली आहे.
अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी मुलीला पळवून नेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस हवालदार डि. व्हि. झरेकर करीत आहेत.