अहमदनगर Live24 टीम, 06 नोव्हेंबर 2021 :- अहमदनगर जिल्हा रुग्णालयात झालेल्या आगीच्या दुर्घटनेत 10 रूग्णांचा मृत्यू झाला, तर काही जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या अति दक्षता विभागातील करोना कक्षाला आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली होती यात मृतांची संख्या आता वाढते दरम्यान या आगीच्या दुर्घटनेत आणखी एकाचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा ११ झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून दोन रुग्ण सिरीयस असून मृत्यूशी झुंज देत आहेत.
या दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. तर आगीत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाखाच्या मदतीची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलीय. दरम्यान आगीची घटना कळताच मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ
यांच्याशी तसेच मुख्य सचिव यांच्याशी बोलून तातडीने सध्या उपाचारधिन रूग्णांना उपचार मिळण्यात काही अडचणी येणार नाही ते पाहण्यास सांगितले असून जिल्हाधिकाऱ्यांनी या दुर्घटनेची सखोल चौकशी करून अहवाल सादर करावा असे निर्देश दिले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. नातेवाईकांना धीर देत जखमी रूग्ण लवकर बरे होतील, असे त्यांनी म्हटले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम