अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2021 :- पारनेर तालुक्यात एक अत्यंत अभिधान अपघात झाला आहे. याबाबत समजलेली माहिती अशी कि, निघोज कुुंड रस्ता ते निघोज रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या जीपचा भीषण अपघात झाला.(ahmednagar accident)
या अपघातात पुणे जिल्यातील तिन भाविक गंभीर जखमी झाले. याबाबत अधिक माहिती अशी कि, पुणे जिल्ह्यातील खेड, येथील भाविक पारनेर तालुक्यातील निघोज येथील मळगंगा देवीच्या दर्शनासाठी येत असताना क्रूझर जिपच्या चालकास अचानक चक्कर आली.

यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने क्रुझर जिप रस्ता सोडून लगतच्या खड्ड्यांमध्ये जाऊन पडली. त्यात क्रुझरमध्ये असलेल्या प्रवाशांपैकी चालक मिनिनाथ भोगाडे याच्यासह मिरा मांजरे,
जानकाबाई मांजरे हे तिघे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहीती निघोज प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर राजेंद्र घुले यांना समजल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
ऍम्ब्युलन्सला बोलवून तिनही गंभीर जखमींना शिरूर जि. पुणे येथील खाजगी रूग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम