अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :- विधवा महिलेवर वारंवार अत्याचार केल्याची फिर्याद तोफखाना पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी साजिद अब्दुललतीफ शेख ऊर्फ लाला (रा. बोल्हेगाव) याच्याविरुद्ध बलात्कार, जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा नोंदवला आहे.
पीडित महिलेच्या पतीचे निधन झाल्यामुळे ती मुलांसह एका उपनगरात तिच्या माहेरी राहत होती. तिची साजिदसोबत ओळख होती.

याचा गैरफायदा घेत साजिदने तिच्याकडे लग्नाची मागणी धरली. यासाठी तो फिर्यादी, तिचे मुले, आई व भावाला जीवे मारण्याची धमकी देत होता. साजिदने फिर्यादीला मे २०२१ मध्ये त्याच्या घरी नेऊन तिच्यावर अत्याचार केला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम