अहमदनगर ब्रेकिंग : भर बाजारात पत्नीची गळा चिरुन हत्या !

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑक्टोबर 2021 :- भर बाजारात पतीने पत्नीचा गळा चिरुन हत्या केल्याची घटना राशीन येथे शुक्रवारी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास घडली.

तालुक्यातील राशीन येथे सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास दीपाली राहुल भोसले व लता बारकू आढाव हे राशीन येथील सिद्धटेक रस्त्याने जात असताना दीपालीचे पती राहुल सुरेश भोसले (रा. अजिंठानगर,पुणे) याने दीपाली हिस माझा मोबाईल दे, असे म्हणाला, यावर दीपालीने माझ्याकडे मोबाइल नाही, असे सांगितल्याने

राहुल भोसले यांनी आपल्या हातातील चाकूने पत्नी दीपाली राहुल भोसले (२५, हल्ली रा.राशिन ता. कर्जत) हिच्या गळ्यावर चाकूने वार करून गंभीर जखमी करून ठार केले.

यावेळी लता आढाव यांनी दीपाली हीस वाचवण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या डोळ्याजवळ वार करून त्यांनाही जखमी केले. आरोपी राहुल भोसले यास पसार झालेली कर्जत पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून परिसरात फोन कॉल केल्याने

ग्राम सुरक्षा दलाचे सदस्य,पोलीस मित्र यांच्या मदतीने दोन तासात आरोपी राहुल भोसले यास पोलीस पथकातील अधिकारी आणि कर्माचार्यांनी ताब्यात घेतले.

मृत दिपाली आणि राहुल भोसले यांच्यात कौटुंबिक वाद असल्याने गेल्या वर्षभरापासून दीपाली या माहेरी राहत होत्या वरील प्रकाराबाबत जखमी लता आढाव यांच्या फिर्यादीवरून कर्जत पोलिस ठाण्यात राहुल भोसले यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. असून अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ हे करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe