अहमदनगर जिल्ह्यातील राज्याला हादरवनारे एक कोटी लाच प्रकरण ताजे असतानाच आता अहमदनगरमधून आणखी एक धक्कादायक बातमी आली आहे. शासकीय ठेकेदाराचे बिल देण्यासाठी चक्क महिला सरपंचाने लाच घेतली असून तिच्या पतीसह, पतीसह महिला सरपंचासही जेरबंद करण्यात आले आहे.
सरपंच उज्ज्वला सतीश राजपूत व तिचा पती सतीश बबन रजपूत असे आरोपींचे नावे आहेत. ही खळबळजनक घटना श्रीगोंदे तालुक्यात घडली. आजवर सरकारी, खासगी कर्मचारी, अधीकारी लाच घेताना पकडे आहेत, परंतु सरपंचानेच असं करावं ही धक्कादायक गोष्ट आहे. हा प्रकार म्हणजे कुंपणाने शेत खाण्याचा प्रकार आहे अशी चर्चा लोक करत होते.
अधिक माहिती अशी : श्रीगोंदे तालुक्यामधील कोकणगाव ग्रामपंचायत हद्दीत रस्ता दुरुस्ती व संरक्षणभिंत बांधकामाचे ४ लाख ६१ हजार ५६८ रुपयांचे काम शासकीय ठेकेदाराने घेतले होते. कामकाज पूर्णत्वाकडे असताना कामाचे बिल अदा करण्याचे त्या शासकीय ठेकेदाराने सांगितले.
परंतु ही रक्कम देण्याआधी आरोपींची या कामाच्या एकूण बिलाच्या १० टक्के म्हणजे ४६ हजार रुपयांची लाच मागितली. असा प्रकार झाल्याबर त्याने लाच लाचलुचपतकडे धाव घेतली. २३ नोव्हेंबर रोजी ही लाच देण्याचे ठरले. त्यानुसार ते आले. तेथे तडजोड करत ४० हजार रुपये देण्याचे ठरले. त्याचवेळी त्यांना जेरबंद करण्यात आले.
कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खासगी इसमाने कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास ०२४१- २४२३६७७ किंवा टोल फ्रि क्रं. १०६४ वर संपर्क साधावा असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने यावेळी करण्यात आले.