नगर जिल्ह्यातील 22 कारखान्यांकडून 1 कोटी मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण

Published on -

अहमदनगर Live24 टीम,  16 फेब्रुवारी 2022 :-  नगर जिल्ह्यातील 22 कारखान्यांनी 1 कोटी 4 लाख 71 हजार 128 मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे.जिल्ह्यात ऊस गाळपात अंबालिका व ज्ञानेश्वर साखर कारखाना आघाडीवर आहे.

दरम्यान यंदाचे सुरू असलेल्या गळीत हंगामात राज्यातील एकूण 197 साखर कारखान्यांनी 15 फेब्रुवारी 2022 अखेर 829.18 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून 843.67 लाख क्विंटल साखर उत्पादित केली आहे.

राज्याचा सरासरी साखर उतारा 10.19 टक्के आहे. दि.15 फेब्रुवारी 2022 अखेर राज्यातील 98 सहकारी व 99 खाजगी अशा एकूण 197 साखर कारखान्यांचे ऊसाचे गाळप करून 843.67 लाख क्विंटल साखर उत्पादित केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe