अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2021 :- जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगीत अकरा जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये आता आणखी एकाची भर पडली असून आता बळींची संख्या बारा झाली आहे.
खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेले जखमी लक्ष्मण आश्राजी सावळकर (वय ६०) यांचा मृत्यू झाला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, लक्ष्मण आश्राजी सावळकर (वय- ६० रा. बोधेगाव ता. शेवगाव) यांच्यावर नगर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
मात्र आता त्यांचा मृत्य झाल्याने जिल्हा रुग्णालय अग्निकांड प्रकरणी मृतांची संख्या १२ झाली आहे. ६ नोव्हेंबर रोजी जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला आग लागून 11 लोकांचा मृत्यू झाला होता.
तर सहा रूग्ण जखमी झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. यातील एकाचा आज सकाळी मृत्यू झाला आहे. आग लागली त्यावेळी अतिदक्षता विभागात १७ करोना रूग्णांवर उपचार सुरू होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम