अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2021 :- नगर शहरातील लोखंडी कमानीवर जाहिरात लावताना वीजेचा धक्का सौरभ चौरे या युवकाचा मृत्यू झाला होता.
दरम्यान चौरे युवकाच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, संबंधीत जाहिरात ठेकेदार व जबाबदार असणार्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी शहरातून कॅण्डल मार्च काढण्यात आला.

दरम्यान नालेगाव येथील चौरे यांच्या राहत्या घरापासून या कॅण्डल मार्चची सुरुवात करण्यात आली. दिल्लीगेट येथे सौरभ चौरे याला श्रध्दांजली वाहण्यात आली. शांततेत निघालेल्या कॅण्डल मार्चमध्ये चौरे कुटुंबीयांसह शहरातील युवक मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
याबाबत अधिक माहिती अशी कि, शहरात सावेडीतील प्रोफेसर कॉलनी चौकात असलेल्या लोखंडी कमानीवर जाहिरात (फ्लेक्स) लावताना सौरभ चौरे (वय 22 वर्षे) याला कमानी जवळ असलेल्या विद्युत वाहक तारांचा स्पर्श होऊन वीजेचा धक्का बसला.
यामध्ये तो खाली पडून दुर्देवी मृत्यू झाला. महापालिकेने पुणे येथील एका संस्थेला दहा वर्षाच्या करारावर शहरामध्ये विविध ठिकाणी दिशादर्शक फलक असलेल्या कमानीवर जाहिरात करण्यासंबंधी बीओटी तत्त्वावर ठेका दिला आहे.
मात्र ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे एकाचा जीव गेला आहे. या प्रकरणात युवकाच्या मृत्यूस संबंधित ठेकेदार व महापालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप चौरे कुटुंबीय व उपस्थित युवकांनी केला.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम