अहिल्यानगरमध्ये हनीट्रॅपची प्रकरणे काही नवीन नाहीत. परंतु आता एका प्रकरणाने चांगलीच खळबळ उडाली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील एका पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्याने पोलीस कर्मचाऱ्यालाच हनीट्रॅपमध्ये अडकवले असल्याची चर्चा सध्या जिल्ह्यात रंगली आहे.
आम्ही एका नेत्याला अडकवलंय आता तुझा कार्यक्रम करू असे म्हणत त्या पोलिसाला महिला पदाधिकाऱ्याने व तिच्याबरोबर असलेल्या दोघांनी हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकवत अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत ५० लाखाची खंडणी मागितली असल्याची माहिती या चर्चेतून मिळाली आहे. आता ही जोरदार चर्चा आहे, त्याच्यात सत्यता किती हे मात्र माहित नाही.

सदर तरुणीचे संबंधित पोलीस कर्मचाऱ्याशी आठवड्याभरापूर्वी ओळख झाली होती.या ओळखीच्या माध्यमातून संबंधित तरुणीने त्या पोलीस कर्मचाऱ्याचा नंबर घेतला व त्या नंबर वर मेसेज सुरु केले. संबंधित तरुणीने त्या पोलीस कर्मचाऱ्याला शहरातील एका धार्मिक ठिकाणी बोलवून घेतले तसेच मंदिरा पासूनकाही अंतरावर असलेल्या एका रूमवर नेले.
त्या ठिकाणी त्या पोलीस कर्मचाऱ्याला संबंधित तरुणी व तिच्याबरोबर असलेल्या दोघांनी तुमचे मॅटर आमच्याकडे आलेले आहे. मी यापूर्वी बड्या नेत्याचा कार्यक्रम वाजवला आहे. तुमचाही कार्यक्रम वाजवू, त्यामुळे तुम्हाला आता आम्ही जसे सांगेल तसे करावे लागेल अन्यथा याचे परिणाम वेगळे होतील असे धमकावत ५० लाख रुपयांची मागणी केली अशी चर्चा आहे.
दरम्यान त्या पोलिसाने संबंधित तरुणीशी, तिच्याबरोबर आलेल्या दोघांशी चर्चा करून काही काळापुरती त्यांच्याकडून सुटका करून घेतली असल्याची माहिती समजली आहे. आता या केवळ चर्चा आहेत की की सत्य घटना आहे हे मात्र जर कोठे फिर्याद दाखल झाली तरच समजेल. तोपर्यंत या चर्चाच राहतील.