अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2021 :- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातर्फे पोलीस शिपाई पदासाठी आज 19 नोव्हेंबर रोजी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. दरम्यान सहा जिल्ह्यांमध्ये 444 परीक्षा केंद्रे राहणार आहेत.
तर नगर जिल्ह्यात 47 परीक्षा केंद्र असून 117068 परीक्षार्थी नशिब अजमाविणार आहेत. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत पोलिसांच्या 720 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
त्यासाठी पहिला टप्पा म्हणून लेखी परीक्षा होत असून राज्यभरातून तरुणांनी अर्ज सादर केले. त्यातील पात्र ठरलेल्या 190319 उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येत आहे.
लेखी परीक्षा शुक्रवार 19 नोव्हेंबर रोजी दुपारी तीन ते साडेचार या वेळेत होणार आहे. परीक्षार्थींनी दुपारी एकपासून केंद्रावर हजर राहणे आवश्यक आहे. हॉलतिकिट, सध्याचा फोटो असलेले ओळखपत्र, आवश्यक आहे.
कॉपी तसेच डमी परीक्षार्थी, असे प्रकार टाळण्यासाठी परीक्षा केंद्रावर परीक्षार्थींचे व्हिडिओ शुटिंग होणार आहे. अनुचित प्रकार घडू नये यासाठी 11 हजार पोलिसांचा बंदोस्त तैनात करण्यात आला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम