प्रदीर्घ कालावधीनंतर शाळा परिसरात घुमला चिमुरड्यांचा किलबिलाट

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2021 :-  कोरोना मुळे गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेल्या शाळा आता हळूहळू सुरु होण्यास सुरुवात झाली आहे. यातच शालेय विभागाने जाहीर केल्या नुसार आज पासून पहिले पासूनचे वर्ग सुरु सुरु झाले आहे. 

या अनुषंगाने आज नगर जिल्ह्यातील शाळा परिसरात देखील चिमुरड्यांची गर्दी पाहायला मिळाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरु झाल्या असल्याने कोरोना नियमांचे पालन करणे सर्वांसाठी बंधनकारक करण्यात आले आहे.

यामुळे आज चिमुकल्यांच्या चेहऱ्याला मास्क दिसले. त्यातच कोरोना संसर्गाशी निगडीत येणाऱ्या बातम्यांमुळे पाल्याला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या पालकांच्या चेहऱ्यावर काहीशी भीती दिसत होती.

दरम्यान यावेळी पालक आपल्या पाल्यांना काळजी घेण्यासंदर्भात वारंवार सूचना देताना दिसत होते. शाळांनी देखील विद्यार्थ्यांचे उत्साहाने स्वागत केले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा व्यवस्थापनाने दिलेली जबाबदारी शिक्षक काटेकोरपणे पार पाडत होते. शहरातील बहुतेक शाळांमध्ये एका वर्गात पन्नास पेक्षा अधिक विद्यार्थी आहेत.

अशा वेळी ऑनलाइन, ऑफलाइन अशा दोन्ही स्वरूपात शिक्षण देणे, अंतराची अट पळून वर्ग भरण्याची व्यवस्था करणे, शाळा खोल्यांचे निर्जंतुकीकरण करणे,

वाहतुकीची व्यवस्था करणे, शाळा परिसर स्वच्छता ठेवणे, शिक्षकांची लसीकरण, शिक्षकांबरोबर इतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण अशा बाबींची तयारी करण्यासाठी शाळांनाही काही वेळ मिळणे आवश्यक असल्याचे काहींचे म्हणणे यावेळी आले. याचबरोबर शिक्षक कर्मचाऱ्यांना गेल्या 48 तासात कोरोना चाचणीचा अहवाल देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe