अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2021 :- अहमदनगर सह राज्यात गाजत असलेल्या बेकायदेशीर बायोडिझेल विक्री प्रकरणात दिलीप सातपुते यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर शिवसेनेने शहरप्रमुख पदावरून तत्काळ उचलबांगडी केली आहे.
नगर शहर प्रमुख पदाला स्थगिती देण्याबाबत सामनातून अधिकृतपणे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे.

file photo
नवीन शहर प्रमुखाची नियुक्ती लवकरच केली जाईल, असेही शिवसेनेकडून सांगण्यात आले आहे.
कोतवाली पोलिस ठाण्यात बायोडिझेल प्रकरणी गुन्हा दाखल आहे. यात 22 आरोपी निष्पन्न झाले आहेत.
त्यात दिलीप सातपुते यांचाही समावेश करण्यात आला आहे. सातपुते सध्या पसार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम