अहमदनगर शहर शिवसेनेच्या शहरप्रमुख पदी संभाजी कदम यांची निवड

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- नगर शहर शिवसेनेच्या शहरप्रमुख पदी संभाजी कदम यांची निवड करण्यात आली आहे.

दरम्यान बायोडिझेल प्रकरणात नाव आल्यानंतर माजी नगरसेवक दिलीप सातपुते यांना शहरप्रमुख पदावरून दूर केले होते. त्यानंतर शहरप्रमुख पदी कोणाची वर्णी लागणार यांची चर्चा जोरदार सुरू होती.

यापुर्वी ही संभाजी कदम यांनी शहर प्रमुखपद योग्य रितीने सर्वांना सोबत घेऊन सांभाळलेले आहे व पक्ष वाढीसाठी अथक परीश्रम घेतलेले आहेत.

मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यांतील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या प्रभारी नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन या नियुक्त्या प्रभारी करण्यात आल्या आहेत. नगर जिल्ह्यातील पदाधिकारी समन्वयक : कैलास केसेकर ( विधानसभा संगमनेर , अकोले ) ,

उपजिल्हाप्रमुख : भाऊसाहेब हासे ( संगमनेर तालुका ) , शहरप्रमुख : अमर कतारी ( संगमनेर शहर ( उत्तर ) , प्रसाद पवार ( संगमनेर शहर दक्षिण ) , संभाजी कदम ( नगर शहर )..

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe